नोटाबंदी आणि ई-पेमेंट

नोटाबंदी इंटरेस्टिंग आकडेवारी :-

डेबिट कार्डचा एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती वापर होतो ?

नोटाबंदीच्या आधी म्हणजे
ऑगस्ट महिन्यात ७५ कोटी ६७ लाख वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख १९ हजार कोटी रुपये.

सप्टेंबर महिन्यात ७४ कोटी २२ लाख वेळा एटीएममध्ये डेबिट कार्डाचा वापर केला गेला , काढले गेले २ लाख २२ हजार कोटी रुपये,

ऑक्टोबर महिन्यात ८० कोटी वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख ४२ हजार कोटी रुपये.

आरबीआयची गेले दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर देशभरात वर्षाला अंदाजे २५ लाख कोटी रुपये एटीएममधून काढले जातात, म्हणजे महिन्यात आपली जनता सरासरी २ लाख कोटी रुपये एटीएममधून काढते,याचा अर्थ आपल्या २ लाख २० हजार एटीएम्समध्ये महिन्याला २ लाख कोटी रुपये असले तरी देशाची गरज भागते..

नोटाबंदीनंतर च्या पहिल्या महिन्यात म्हणजे १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात ४ लाख ६१ हजार कोटींच्या नव्या नोटा चलनात दिल्या असं आरबीआयने १५ दिवसांपूर्वी (१३ डिसेंबरला) सांगितलं होतं, यातल्या फक्त २ लाख कोटी रुपयांच्या नोटा एटीएममध्ये भरायची तजवीज केली असती तरी देशातले सर्व एटीएम चालू राहिले असते, Continue reading

एटीएमचं जाळं वाढेल?

देशात एकूण किती ATMs आहेत?   

२ लाख १५ हजार ३९

देशात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?

 

बँक एटीएमची संख्या
SBI ४९ हजार ६६९
ICICI १४ हजार ७३
AXIS १२ हजार ८७१
HDFC १२ हजार १३

 

देशात कोणत्या भागात किती एटीएम?

 

महानगर शहरी भाग निम शहरी ग्रामीण   एकूण
५५९६० ६०३०१ ५८४३३ ४०३४५ २,१५, ०३९

(स्त्रोत – आरबीआय, जून २०१६)

 

महाराष्ट्रात एकूण किती ATMs आहेत?    Continue reading

चलन वेदना

किमान चार महिने चलन वेदना

नोटाबंदीचा निर्णय होऊन १० दिवस उलटले. रांगेतल्या ‘चलन वेदना’ कमी झालेल्या नाहीयत. नोटांची टंचाई नाहीय असं अर्थ खातं सांगतंय तरीही रांग सांशक आहे. 

नोटा आहेत मग सगळीकडे पोहोचायला उशीर का होतोय असा प्रश्न रांगेला पडतोय.

रोजच्या व्यवहारात किती नोटा आहेत, नव्या नोटा यायला किती वेळ लागेल, परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नांनी रांगेची अस्वस्थता वाढतेय.

पंतप्रधान मोदींनी ५० दिवस धीर धरायचं आवाहन केलंय. मात्र चलन वेदना कमी व्हायला कमीत कमी ३ ते ४ महिने लागतील असा अंदाज आहे.  

 एकूण किती नोटा चलनात होत्या? Continue reading

भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड – धोनी

धोनी – द अनटोल्ड स्टोरी मध्ये मला 3 सीन खूप महत्त्वाचे वाटले. त्यातले दोन सीन मला जास्त आवडले. दोन्ही प्रसंगात एकही डायलॉग नाही. तिसरा प्रसंगही भारी जमलाय त्यात 1 डायलॉग आहे.

पहिला प्रसंग म्हणजे धोनी शाळेत असतानाचा किस्सा आहे. मॉर्निंग शिफ्ट असूनही त्याच्या वडिलांना रात्री अकराला उठावं लागतं, ग्राऊंडवर लॉनला पाणी देण्याची जबाबदारी असते, ते घराबाहेर पडतात. ‘मही’ धोनी जागाच असतो. वडील घराबाहेर पडले की तो हळूच उठतो, गॅलरीत जातो, त्या थंडीत वडील काम करताना/ लॉनला पाणी देताना तो शांतपणे बघत असतो. आपण प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या वडिलांना असं ‘आपल्यासाठी’ काहीतरी करताना पाहिलंय, त्या सीनसोबत आपण रिलेट करतो, म्हणूनच कदाचित त्या लहानग्या महिच्या मनात काय चाललंय याचा आपण अंदाज लावू शकतो.

dhoni

दुसरा प्रसंग बहुतेक खरगपूरच्या फलाटावरचा आहे. ‘मही’ आपलं मन मारत 4 वर्ष रेल्वेत काम करतोय, करिअर आणि आयुष्य प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 3 मध्ये चकरा मारतंय, स्वप्न आणि सत्य यातला फरक लक्षात आलाय.. सोबतचे आणि मागून आलेले पुढे गेलेत. गाडी मिस झाल्याची भावना आहे. निराशा, फ्रस्ट्रेशन आहे. पण अजूनही आशा सोडलेली नाहीय, विचारात गुरफटलेल्या महिच्या चेहऱ्याचे वेगवेगळ्या अँगलने फक्त क्लोजप्स दिसतात. आपल्या प्रत्येकाच्या किंवा बहुतांशांच्या आयुष्यात असे प्रसंगही आलेत/येतात, त्यामुळेच कदाचित महीच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण लावू शकतो.

आपण ज्याला माही म्हणतो तो खरं तर ‘मही’ आहे हे मला हा सिनेमा बघताना कळलं, तशाच महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यातल्या आणखी काही गोष्टीही.

लहानपणी धोनीचं पहिलं प्रेम फुटबॉल. गोलकिपींगचा भारी शौक, त्यानंतर टेनिस, बॅडमिंटनचा नंबर, क्रिकेट तर दूरवर कुठेच नाही, “छोटे बॉलसे कौन खेलेगा” हे त्यामागचं साधं सोपं कारण. शाळेतल्या शिक्षकांमुळे हातातले गोलकिपरचे ग्लोव्ह्ज कसे जातात आणि विकेटकिपरचे ग्लोव्ह्ज कधी येतात ते त्यालाही कळत नाही.

dhoni-1

अंडर-19 कूचबिहार क्रिकेट चषकाची फायनल मॅच अनेक अर्थाने धोनीसाठी महत्वाची. चांगलं खेळून निवड समितीचं लक्ष वेधायची संधी, पुढच्या कारकिर्दीची चावी. नेमक्या याच सामन्यात त्याचा सामना युवराज सिंह सोबत होतो, या सामन्याचा किस्सा खूप मस्त आहे. सिनेमात धोनीच्या तोंडूनच ऐकण्यात मजा आहे. या खेळीमुळे वर्षभरात युवराजला भारतीय संघातही संधी मिळते. धोनी मात्र मागे फेकला जातो, तिथून पुढे यायला त्याला तब्बल 4 वर्ष वाट पाहावी लागते.

याकाळात युवराज, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर, झहीर खान, दिनेश कार्तिक, संजय बांगर अशा तब्बल 30 खेळाडूंना भारताकडून खेळायची संधी मिळाली होती. धोनी मात्र दूर कुठेतरी विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशाकडून दंड वसूल करण्याचं काम करत होता.प्रचंड टॅलेंट असूनही संधी न मिळाल्याने होणारी घुसमट सहन करत होता, खरंतर कुणीही खचून जावं अशी ही परिस्थिती. चार वर्षाचा वनवास … खरंतर अज्ञातवासच.

पण या 4 वर्षानेच धोनीला अनेक गोष्टी शिकवल्या, त्यातली महत्वाची म्हणजे आता धोनीमुळे प्रसिद्ध झालेला हेलिकॉप्टर शॉट. संतोष हा महिचा मित्र हा शॉट भारी खेळायचा, त्याला थप्पड शॉट म्हणायचा, गल्ली क्रिकेट खेळताना समोस्याच्या बदल्यात त्याने हा शॉट धोनीला शिकवला.

धोनीला वेळोवेळी साथ देणारं कुटुंब, शिक्षक, रेल्वेचे अधिकारी आणि मित्र परिवार मोजक्या सीनमधून आपल्याला बऱ्यापैकी कळतो.

मला आवडलेला तिसरा प्रसंग अर्थात ओपनिंग सीन, सगळ्यांना माहितीय 2011 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनी वर खेळायला आला, तोवर अख्ख्या वर्ल्डकपमधे बॅटिंगमध्ये तो फार काही करु शकला नव्हता. त्यामुळे 275 चं टार्गेट आणि 114 वर 3 अशी अवस्था असताना, धोनीचं वर येणं थोडं रिस्की होतं. धोनी बॅटिंगला उतरण्या आधीचे काही क्षण या सीनमध्ये दाखवलेत, हा सीन खास नीरज पांडेच्या स्टाईलनं आल्यामुळे जास्त प्रभावी वाटला, आवडला.

dhoni-3

पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना तिथल्या दुकानातून धोनी त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडला फोन करतो, बोलणं संपवतो. दुकानाबाहेर आल्यावर काही क्षण घुटमळतो, आत विचार सुरुच असतात. तो पुन्हा फोन करण्यासाठी वळतो बहुतेक पण थांबतो. त्या घुटमळण्याच्या गिल्टचा प्रभाव पुढे मैदानावरील आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगात तुम्ही नकळत शोधू लागता..

इंटरवलपर्यंतचा म्हणजे ‘मही’ने गाडी पकडेपर्यंतचा प्रवास जास्त भिडला. यातल्या त्रुटींसहित संपूर्ण 3 तास 5 मिनिटांचा सिनेमा मी एन्जॉय केला.

सुशांतसिंह राजपुतने त्याला दिलेलं काम चोख पार पाडलंय, नीरज पांडे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आहे, तो निराश करत नाही.

जेम्स बॉन्ड जेम्स बॉन्ड का आहे? वरवर शांत, थंड, निर्विकार, तुटक, स्थितप्रज्ञ वागण्याच्या तळाशी काय आहे, हे कसिनो रोयालमधे आपल्याला थोडफार कळतं,

धोनी – द अनटोल्ड स्टोरी, क्रिकेटच्या मैदानावरच्या आपल्या या जेम्स बॉन्डबद्दल अगदी पुसटशी कल्पना देऊन जातो, धोनीचा पार्ट टू सुद्धा भारी बनू शकतो.

पोरका अंगारमळा…

शेतकरी असंतोषाचा जनक, योद्धा शेतकरी गेला…
त्यांचं ‘अंगारमळा’ ज्यांनी अजून वाचलं नसेल त्यांनी जरुर वाचा.
माहिती नाही का पण त्यातला,
त्यांच्या आयुष्यातली त्यांना आठवणारी पहिली घटना; माईंची आणि त्यांची भेट; हा छोटासा प्रसंग मला सर्वात जास्त आवडतो..
इतकं साधं, सोपं लिहिता यायला हवं.
शेतकऱ्यांसाठी जे शरद जोशींनी केलं ते प्रत्येकाला जमेलच असं नाही,
शेतकऱ्यांसाठी यथाशक्ती/ जमेल तसं, जमेल तिथनं आणि जमेल तितकं काम करत राहणं हिच त्यांना आदरांजली असेल…

या वर्षाच्या सुरुवातीला एबीपी माझा शेती सन्मान जीवन गौरव पुरस्कार त्यांना दिला गेला, त्यावेळी त्यांची प्रोफाईल पॅकेज तिथं दाखवलं होतं ते त्यांना आवडलंही.

त्यांचा संकलित अंश…

शेतकरी असंतोषाचे जनक

शेतकरी असंतोषाचे जनक

देशातला संख्येने सर्वात मोठा समाज म्हणजे शेतकरी, पण जितका मोठा तितकाच विखुरलेल्या या समाजाला -शेतकरी तितुका एक एक- असं म्हणत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला शरद जोशींनी… शेतात काम करणं, राबणं, शेती यशस्वी करणं म्हणजे काय याची बांधावरुन कल्पनाही येणं कठीण..

हे काम म्हणजे एक यज्ञकुंड…अंगारमळाच हे केवळ एका शेतकऱ्यालाच कळू शकतं.

ही जाणीव जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शरद जोशींच्या याच कार्याप्रती कृतज्ञता म्हणून जीवनगौरव शेती सन्मान पुरस्कार.

ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली,

त्यांना घामाचे दाम मागायला, लढायला शिकवलं.. संघटीत केलं…

त्यांच्या संतापाला, दु:खाला आवाज मिळवून दिला…

आधुनिक शेतीचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होणं शक्य नाही ते नाव म्हणजे

योद्धा शेतकरी

शरद जोशी…

संयुक्त राष्ट्र संघटनेची आरामदायी नोकरी सोडून एक तरुण महाराष्ट्रात परत येतो काय, स्वत: कोरडवाहू शेती कसतो काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी झपाटला जातो काय, देशभरातील शेतकऱ्य़ांना संघटीत करतो काय. सारं काही अचंबित करणारं… आजच्या काळात अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट शरद जोशींच्या रुपानं ऐंशीच्या दशकात सत्यात उतरली..

योद्धा शेतकरी

योद्धा शेतकरी

35 वर्षांपूर्वी नाशकात कांदा आणि ऊस दर आंदोलन झालं आणि शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचं नाव गावागावात पोहोचलं.

शेतकरी तितुका एक-एक, भीक नको हवे घामाचे दाम या घोषणांनी शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात अंगार चेतवला.

जातपात, धर्म, भाषेच्या भिंती तोडून शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण बनले.

फक्त कांदा किंवा ऊस दराचाच प्रश्न नाही तर मजुरांच्या, महिलांच्या समस्यांनाही त्यांनी आंदोलनातून आणि लिखाणातून वाचा फोडली..

लक्ष्मी मुक्तीचा, शेती अर्थ स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आणला,

इंडिया आणि भारतातला फरक शेतकऱ्याच्या चुलीशेजारील गाडग्यातील दाण्यापर्यंत पोहोचवला…

शरद जोशींची ही नि:स्वार्थ शेतीसेवा आपल्याला प्रेरणा देत राहिल

हा योद्धा शेतकरी आज विसावलाय, पण शेतकऱ्याचा लढा सुरुच आहे, त्यानं फुलवलेला अंगारमळा शेतकरी आंदोलनाला धग देत राहिल…

बिहारचं बेसिक चित्र

बिहार

विधानसभेच्या एकूण जागा –  २४३ (जनरल -२०३, एससी – ३८, एसटी-२)

बहुमतासाठी आवश्यक ‘Magic Figure’१२२

मतदानाचे टप्पे – पाच (१२, १६, २८ ऑक्टोबर, १ आणि ५ नोव्हेंबर )

एकूण मतदार – ६ कोटी ६८ लाख २६ हजार ६५८

मतदान केंद्र – ६२ हजार ७७९

मतमोजणी – रविवार ८ नोव्हेंबर

bihar

लढाई बिहारची

जातींचं समीकरण

ओबीसी+इबीसी – ५१ टक्के

महादलित+दलित – १६ टक्के Continue reading

अच्छे दिन…साठेबाजांचे?

जगात सर्वात जास्त डाळीचं उत्पादन होणारा देश – भारत

सगळ्यात जास्त डाळ खाल्ली जाणारा देश – भारत

पण तुमच्या ताटातील डाळ ही म्यानमार मधली असू शकते, 

कारण सर्वात जास्त डाळ आयात करणारा देशही – भारत

कडधान्य किंवा डाळवर्गीय पिकात वाटाणा, हरभरा, काबुली चना, तूर, मूग, उडीद, मसूर ही महत्वाची पिकं आहेत.

डाळ मे काला?

डाळ मे काला?

डाळी म्हणजे गरीबाच्या ताटातलं प्रथिनं मिळण्याचा हक्काचा स्त्रोत मानल्या जातात. मुलांची मानसिक शारिरीक वाढीसाठी प्रथिनं अत्यावश्यक घटक, त्यातही शाकाहारीं लोकांची प्रथिनांची गरज डाळींमधून पूर्ण होते त्यामुळेच डाळीची दरवाढ जास्त चिंतेचा विषय ठरायला हवा. १९५१ साली देशातील प्रत्येकाच्या ताटात वर्षाला २२ किलो म्हणजे रोज ६० ग्रॅम डाळ असायची, आज ते प्रमाण १५ किलोच्या म्हणजे रोज ४० ग्रॅम असं कमी झालंय.

डाळवर्गीय पिकांची सध्याची स्थिती Continue reading

महाराष्ट्रात असं असेल मतदान 2014

सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात 9 टप्प्यात मतदान होईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली. त्याची सुरुवात  7 एप्रिलपासून होईल आणि 12 मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपेल.

मतमोजणी  शुक्रवार 16 मे रोजी होणार, म्हणजेच जर त्रिशंकू स्थिती राहिली नाही तर 16 मे रोजी देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.

GENERAL ELECTION 2014

GENERAL ELECTION 2014

देशाची राजधानी दिल्लीत 10 एप्रिल रोजी तर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत 24 एप्रिल रोजी मतदान होईल.

महाराष्ट्रात 3 टप्प्यात मतदान होईल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 24 एप्रिल रोजी राज्यात मतदान होईल. या तीनही तारखांना गुरुवार आहे.

पहिल्या टप्प्यात म्हणजे 10 एप्रिलला 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल, यात विदर्भातील सर्व म्हणजे 11 जिल्ह्यातील 10 जागांचा समावेश आहे.

Continue reading

सैरभैर मनसे

राज्यातल्या आणि देशातल्या घडामोडींकडे, तथाकथित आंदोलनांकडे एक नजर टाकली तरी कळतं… निवडणुका जवळ आल्या आहेत…

दिल्ली निवडणुकांमध्ये ‘आम आदमी पार्टी’ने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, त्याने प्रमुख राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीसाठी वेगळा विचार करायला भाग पाडलं. ‘आप’ला कमी लेखणारी जशी मंडळी आहेत तशीच त्यांच्या आंदोलनाची पहिले कोण कॉपी करतो यासाठी चढाओढ करणारीही आहेत. त्यामुळेच अनेक नेते- पक्ष झोपेतून अचानक जागे झाल्यासारखं; लोकहिताचे वगैरे मुद्दे घेतायत. सध्याचा मनसेचा टोल राडा त्याचाच एक भाग… वेगवेगळ्या चॅनेलच्या पॅनलवर फक्त चर्चेपुरते दिसणारे खासदार संजय निरुपम किंवा प्रिया दत्त वगैरे मंडळी अचानक आंदोलनाच्या आखाड्यात दिसतायत ती त्याचमुळे.

ज्या पक्षाची सत्ता… त्याच पक्षाचा आमदार -खासदार… त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करतो… मंत्री, मुख्यमंत्री वगैरे तिथे जाऊन घोषणा करतात असं विचित्र चित्रही आपल्याला पाहायला मिळतंय.

तसंही राज्यात विरोधी पक्षाचं अस्तित्व नसल्यातच जमा होतं. सेनाभाजपच्या चुकांमधून मनसे काहीतरी शिकेल आणि विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढेल अशी अंधुक आशा सुरुवातीला होती.

दु:ख अपेक्षाभंगाचं...

दु:ख अपेक्षाभंगाचं…

2009 मध्ये मराठी अस्मिता वगैरे भावनांचं तात्कालिक कारण होतंच, पण सेना-भाजपला पर्याय म्हणूनच लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं पाहात होते. राज ठाकरेंच्या जगप्रसिद्ध (आणि अजुनही अदृश्य असलेल्या) विकासाच्या ब्लु प्रिंटची भूरळही काहींना पडली असेल, त्यामुळेच मुंबईकरांनी लोकसभेत मनसेच्या उमेदवारांना एक-एक लाख मतं दिली. पाठोपाठ 13 आमदार मनसे विधानसभेत पाठवले, मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचारही सेनाभाजपच्या कामी आला नाही. Continue reading

मला बी आपमंधी येंऊं द्या की रं…

स्थळ: जंतर मंतर, दिल्ली.

दिनांक: 11 डिसेंबर

वेळ: रात्री 8 नंतरची

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत मोठं यश मिळवलं.

सर्वसामान्यातील सर्वसामान्य लोकांना विधानसभा निवडणुकीत उभं केलं, लोकांनी त्यांना निवडुनही दिलं. जंतरमंतरवर सगळ्या नवीन निवडून आलेल्या आमदारांसह केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधला, सगळ्या वाहिन्यांनी ते लाईव्ह दाखवलं. सगळ्या प्रामाणिक लोकांनी आप मध्ये यावं असं आवाहन त्यांनी केलं. तेवढचं नाही तर प्रत्येक पक्षात ईमानदार लोक आहेत, त्यांची तिथे घुसमट होत आहे त्यांनी बंड करावं किंवा आमच्या आम आदमी पक्षात यावं असं आवाहन केलं. उद्या कुमार विश्वाससोबत राळेगणाला जाणार आणि अण्णांच्या समोर पब्लिकमधे बसणार वगैरे घोषणाही केली.

————–*********************———————

स्थळ:- साहेबांचं निवासस्थान

दिनांक 11 डिसेंबर

वेळ रात्री 8 नंतरची

दिल्लीतील निकालानंतर साहेब अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते.

अखेर ही संधी साधून नाराजीला ब्लॉगमधून थोडी वाट मोकळी करुन दिली होतीच,

राहुल की सोनिया, मनमोहन की पृथ्वीराज, आप (AAP) की नॅक (NAC), की आणखी कोण… नेमकं निशाण्यावर कोण आहे; हे कळायला नको अशी नेहेमीची मोजकी सूचना ब्लॉग टिमनं तंतोतत पाळल्याचं समाधान चेहेऱ्यावर होतं… Continue reading